पुलगाव–शिरपूर २५ किमी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव ते शिरपूर या सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी ‘युवा परिवर्तन की आवाज’ सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुलगाव–विजयगोपाल मार्गे शिरपूर हा महत्त्वाचा रस्ता गेल्या १५ ते…