पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी
पंचनामे करुन नुकसानीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
वर्धा : सेलू व वर्धा तालुक्यातील काही भागात दिनांक १८ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्त सेलू तालुक्यातील मदनी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी साचून झालेल्या नुकसानीची तसेच वर्धा तालुक्यातील आंजी येथील गावात नदीला पूर आल्यामुळे गावातील घरांच्या झालेल्या नुकसानीची पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी पाहणी केली. ग्रामसेवक,…