प्रतिनिधी अमरावती :
युवक बिरादरी भारत च्या वतीने घेण्यात आलेल्या 2025 च्या राष्ट्रीय युवा भूषण स्पर्धा व राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेत सहभागी होऊन दोन्ही स्पर्धेत अव्वल येत विधी विद्यार्थी आशुतोष वंदना संतोष इंगळे याने डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती, चे नाव राष्ट्रीय स्तरावरती अधोरेखीत केले.
युवक भारत बिरादारी 2025 आयोजित राष्ट्रीय युवा भूषण स्पर्धेसोबतच युवा सांसदपट्टू हा युवक बिरादारी चा सर्वोच्च पुरस्कार पटकाविला आहे..
मुंबई येथील मुकेश पटेल ऑडिटोरियम येथे नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात सुप्रसिद्ध सिनेअभिनेते अभिषेक जी बच्चन यांच्या हस्ते दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले… यावेळी सन्मानपीठावर पद्मश्री क्रांती शहा यांच्या सह अमरीश पटेल , डॉ आशीषराव देशमुख , रोहिणी हट्टागणी , डॉ राम चड्डा यांची उपस्थिती होती… या यशा बद्दल त्याचे डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ वर्षा देशमुख मॅम यांच्यासह सर्व प्राध्यापक मंडळी , शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले…






